शिवजयंती जबरदस्त भाषण/शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj bhashan/Shivjayanti 2020
शिवजयंती भाषण 2020 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय भवानी...जय शिवाजी... ज्यांच्या कुशीतच स्वराज्याच देखणं स्वप्न निर्माण झालं त्या थोर राजमाता जिजाऊ, स्वराज्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकार करणारे जिजाऊपुत्र आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वारसदाराने हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं शिवपुत्र संभाजीराजे आणि स्वराज्याच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांसाठीच जगायचं आणि त्यांच्यासाठीच मरायचं असा निश्चय करून शिवरायांना लाखमोलाची साथ देणारे छत्रपती शिवरायांचे मावळे यांना मानाचा मुजरा करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. मित्रांनो, शिवजन्मापूर्वीचा काळ फार भयंकर होता.वर्षानुवर्षे गुलामगिरीचे राज्य चालत आले होते.जन्म घ्यायचा गुलामगिरीत,जगायचे देखील गुलामगिरीत आणि मरायचं देखील गुलामगिरीतच.अशा गुलामगिरीच्या दुष्टचक्रात पिढ्यानपिढ्या मरत होत्या.पण गुलामगिरी थांबण्याच नाव घेत नव्हती.या काळात सहसा कोणी विरोधात जात नव्हते आणि जर कोणी विरोधात गेलं तर त्याला मरणयातना किंवा थेट मरणच मिळायचे.अशी स्थितीतच राजमाता जिजाऊनी स्वराज्याच स्वप...